चायना पार्सलच्या नावाखाली नवा सायबर फ्रॉड ! सावध राहा ! ⓒ – ॲड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: कालच एक कॉल आला की, माझी ३५,४५० रुपयाची फसवणूक झाली आहे, काय करू कळत नाहीय?” आधी मी त्या मॅडमना शांत केलं आणि नीट काय घडलं ते समजून घेतलं. त्यानंतर त्यांना जे उपाय सांगितले ते उपाय व एकूणच हा नवीन फ्रॉड नेमका कसा घडतो ते इथं सर्वाना सांगतोय.एक कॉल येतो की, आम्ही अमुक अमुक कुरियर कंपनीतून बोलतोय. आणि तुमच्या नावाने चायनाला पाठवले जाणारे एक पार्सल आले आहे ! ते आमच्या दृष्टीने संशयास्पद आहे. बेकायदेशीर आहे. आणि सध्या तर चीन संदर्भात आम्ही प्रचंड काळजी घेतोय. आमची कम्पनी रेप्युटेड असल्याने आता आम्हाला तुमच्या पार्सल बद्दल मुंबई पोलिसाना तक्रार करावी लागेल. तुम्ही आणि ते पाहून घ्या. ऑल क्लियर झाल्यावर सांगा आम्हाला’ आणि मग कॉल ठेवला जातो.मॅडम नंतर तुम्हाला व्हाट्सअप वर कॉल येतो (व्हाट्स अप वर का ? तर साधा कॉल एखादवेळी रेकॉर्ड केला जाऊ शकतो आणि फ्रॉड करणारे अडकू शकतात म्हणून ! व्हाट्स अप कॉल हि रेकॉर्ड करता येतो पण तो इतक्या सहज करता येत नाही. त्यामुळे शक्यतो हॅकर लोक व्हाट्स अप वरच कॉल करतात) तर असा कॉल येतो आणि समोरून व्यक्ती सांगते, “मुंबई पोलीस कडे तुमच्याविरुद्ध तक्रार आलीय. तुम्ही बेकायदा पार्सल पाठवताय असं कळत. तर आम्हाला त्यासाठी हा कॉल करतोय. तुमचा आधार कार्ड नम्बर, पॅन नंबर आणि बँक अकाउंट नम्बर इत्यादी माहिती द्या”तुम्ही पॅनिक होता अन समोरची व्यक्ती मागेल ती माहिती देता. नंतर तो कॉल कट होतो आणि थोड्या वेळाने पुन्हा येतो.आणि सांगितलं जात की, “आम्ही तुमचे बँक डिटेल्स मुंबई फायनान्शियल डिपार्टमेंटकडून चेक केले आहेत. त्यानुसार तीन चार क्रेडिट एन्ट्रीज संशयास्पद आहेत. हि मनी लॉन्डरिंग ची केस होऊ शकते. आणि जर तुम्ही इनोसंट आहात, तुम्हाला यातलं काही माहित नाही असं असेल तर एकूण दंडाच्या अमुक टक्क्यामध्ये तुम्ही अमुक एक रक्क्म लगेच आम्ही सांगतो त्या खात्यात भरा. त्यानंतर मग तुमचे नाव त्या केसमधून वगळण्याची प्रोसेस सुरु करू. सगळं क्लियर निघालं तर नंतर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.”आणि मग तुम्ही कारवाईच्या धास्तीने पटकन पैसे भरून मोकळे होता आणि थोड्या वेळाने लक्षात येत की तो सगळाच फ्रॉड आहे. आणि तुमचे पैसे गेलेले असतात. मग आता यावर उपाय काय ? उपाय नक्की आहे. तो सांगतोच. सर्वात प्रथम लक्षात ठेवावं की, अशावेळी अजिबात घाबरू नये. पॅनिक होऊ नये. तुम्ही पॅनिक होणे म्हणजे त्यांच्या सापळ्यात स्वतःहून जाणे ! त्यामुळे एकदम शांत राहून यावर थोडा विचार करायचा. कारण डोकं शांत असेल तर कॉमनसेन्स काम करतो अन तेव्हा कळत की, अरेच्या आपण तर कसलेच पार्सल पाठवले नाहीय. चायनाला तर नाहीच नाही. हे कळलं की तुम्ही मग बिनधास्त समोरच्याला नंतर आलेल्या कॉल वर सांगू शकता की, “जा तुला काय करायच ते कर, आणि मी मात्र आता पोलिसात कम्प्लेंट करणार आहे” असं सांगून मोकळं होऊ शकता. निम्मे फ्रॉड तिथेच थांबतील. अन हॅकर पुन्हा कॉल करणार नाही.आता तुम्ही म्हणाल, काय हे वेड्यासारखं त्या बाई वागल्या ? पार्सल पाठ्वलंच नाही तर घाबरल्या कशाला ? तर मंडळी, त्यावेळी हॅकर लोक (बोलण्यात अत्यंत चतुर असतात) ते असं काही चित्र तुमच्यासमोर उभं करतात आणि जणू हिप्नोटाईज झाल्यासारखे तुम्ही त्याच्या इशाऱ्यावर जणू नाचू लागता. लोक असे वेड्यासारखं का वागतात असा विचार तुम्ही करताय कारण आग दुसऱ्याच्या घरात लागलीय. जेव्हा कधी तुमच्याच पायाखाली असं काहीतरी घडेल तेव्हा कळत की, खरेच त्याक्षणी ९०% लोक पॅनिकच होतात अन घोळ होतो. म्हणून शांत राहून कॉमनसेन्स वापरणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तसेच रस्त्यावर जर अपघात झाला तर जसे आपण जितक्या लवकरात लवकर दवाखाना गाठतो तितके पेशंट वाचण्याची शक्यता जास्त असते. तसेच सायबर फ्रॉड मध्ये पैसे गेले तर त्यानंतर जितक्या कमी वेळेत तुम्ही सायबर सेल कडे जाल तितक्या ते गेलेले पैसे वाचण्याचे चान्सेस जास्त असतात.अर्थात या माझ्या केसमध्ये त्या बाईनीं नंतर रीतसर पोलीस कम्प्लेंट केली. आणि समोरच्याचे अकाउंट ऑफिशियल फ्रिज करण्यात आलेय. त्यामुळे रिकव्हरीचे चान्सेस आहेत.मात्र एक निरीक्षण सांगतो. दुर्दैवी आहे पण सत्य आहे की अशा सापळ्यात खेड्यातील लोक कधीच अडकलेले मी तरी आजवर पाहिले नाहीत. शहरातले विशेषतः उच्चशिक्षित लोकच अडकतात. याचाही समाजातील या वर्गाने विचार करावा.
सावध व्हा आणि आपण जे केलेच नाही ते केले आहे असं म्हणून इतरही कोणत्या प्रकारे तुम्हाला असे कॉल आले तर पॅनिक न होता त्याला ठणकावून सांगा. की “काय करायच ते कर. मीच उलट तुझ्या नावासह, नम्बरसह पोलिसांना कम्प्लेंट करेल” असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी, धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

सावध राहा… सुरक्षित राहा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here