
निफाड : दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आदिवासी मुलांचे वसती गृह निफाड येथे जागतिक धूम्रपान विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मा. गीताताई गायकवाड यांनी “आजची तरुणाई आव्हाने आणि समायोजन ” या विषयावर विद्यार्थी वर्गाशी सवांद साधला यावेळी त्यांनी तरुण वर्गाने आज नवीन आव्हानाना सामोरे जातांना स्वतःला वेगवेगळ्या विषयात अपडेट ठेवण्याची व सकारात्मक विचार अंगीकारत व्यसन विरहीत तरुण नेतृत्व देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच PACE ग्रुप पुणे यांच्या व्यसन विरोधी अभियाना विषयी सविस्तर माहिती दिली.गृहपाल श्री सूर्यभान सुडके यांनी प्रास्ताविक मांडताना अश्याप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन सर्व शाळा महाविद्यालयात करण्याची गरज असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी यावेळी मोकळेपणाने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सवांद साधला व आभार मानले,
