धुळगाव सरपंचपदी रामदास इंगळे बिनविरोध राजीनामा नाट्याचा अखेर द end

0

येवला : तालुक्यातील धुळगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीचा आवर्तन पद्धतीने रिक्त झालेल्या जागेवर रामदास इंगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी कमलेश निर्मळ आणि ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडितके यांनी निवड प्रक्रिया पार पाडली मावळत्या सरपंच सौ दिपालीताई गायकवाड यांनी राजीनामा हा वैध असल्याची तक्रार स्वतः अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली असता गावात तसेच तालुक्यात खळबळ उडवून चर्चेचा विषय ठरला यामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते,परंतु मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांनी कायदेशीर बाबी तपासून पाहता राजीनामा प्रक्रिया कायदेशीर असल्याचे आढळून आल्याने राजीनामा वैध अथवा अवैध असल्याचा व नसल्याचा युक्तिवाद तसेच हरकतीचा मुद्दा नसून पुढील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश करत गावातील जेष्ठ नेते मंडळी अण्णासाहेब गायकवाड यांच्यासह तरुणांनी एकत्र येऊन वार्ड तसेच गाव विकासासाठी कर्तुत्व व कर्तव्यनिष्ठ रामदास इंगळे यांची सर्वानुमते निवड करून बिनविरोध सरपंचपदी निवड करून सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,चैरमन दत्तात्रय गायकवाड,युवा सेना शाखा प्रमुख गोरख गायकवाड,सोमनाथ गायकवाड, वाल्मीक गायकवाड,निलेश महाले,पत्रकार पांडुरंग शेळके,राजेंद्र गायकवाड,जन नायक प्रतिनिधी शशिकांत जगताप, माजी सरपंच कैलाश खोडके,विक्रम गायकवाड,राजेंद्र सोनवणे, सोपान गायकवाड श्रावण खैरनार,विकास मुटेकर ,नारायण बारहाते, जनार्दन सोनवणे, ज्ञानेश्वर झांबरे,विनायक जाधव,भाऊसाहेब गायकवाड यांच्या सह सदस्य दशरथ माळी, दत्तु गायकवाड,सौ वंदना गायकवाड, सौ.रुख्मिणी सोनवणे,आशाबाई आहेर,योगेश गायकवाड व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच रामदास इंगळे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here