
मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय आंतरशालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गुड शेफर्ड हायस्कूल क्रिकेट संघ विरुद्ध एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघामध्ये झाला.हा सामना गुडशेफर्ड हायस्कूल संघाने जिंकून प्रथम पारितोषिक भव्य ट्रॉफी चा मानकरी ठरला.उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सेंट झेवियर्स हायस्कूल क्रिकेट संघ,चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल यांना देण्यात आले.तसेच स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार अंशुमान सरोदे, उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार आयुष व्यवहारे, उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार ओम उगले,उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार ओम दिंडे यांना देण्यात आले.
माजी क्रिकेट खेळाडू हबिबभाई शेख,दत्ता भाऊ झालटे,सनी भाऊ फसाटे, मा.आमदार जगन्नाथजी धात्रक,मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, मा.नगरसेवक सादीकभाई पठाण, पत्रकार आमीन नवाब शेख, पत्रकार अमोलभाऊ खरे, पत्रकार निलेश वाघ, इरफानभाई मोमीन,इरफान भाई,हबिबभाई शेख,मजीद (दादा) शेख, मा.नगराध्यक्ष साईनाथभाऊ गिडगे,पत्रकार राजेंद्रभाऊ धिंगाण,पत्रकार अझहर शेख,फुले,शाहू,आंबेडकरमुस्लिम विचार मंच मनमाड कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख,पदमर साहेब,समाजसेवक अल्ताफभाई शाह,मुश्ताक तांबोळी,आनंद बोथरा,राजाभाऊ आहेर,गुड शेफर्ड मुख्याध्यापक नायडू सर,डॉ.सुहास जाधव,एकनाथभाऊ बोडके यांच्या हस्ते सर्व पारितोषिके देण्यात आले.स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना माजी क्रिकेट खेळाडू हबिबभाई शेख,दत्ता भाऊ झालटे यांच्या तर्फे प्रत्येक शाळेचे नाव प्रिंट करून जर्सी सिल्याबद्दल व सनी भाऊ फसाटे, यांच्या तर्फे प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी, वैभव कापडे यांच्या तर्फे इतर सन्मानचिन्ह,मनोहर सूर्यवंशी सर यांच्या तर्फे स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे,मजिद भाई शेख व रितेशभाऊ बन्सल यांच्या तर्फे सर्व सामन्याकरिता टेनिस बॉल ,स्पर्धेत दोन दिवस खेळाडूंना पाण्याचे जार उपलब्ध केल्याबद्दल,राजाभाऊ जाधव यांच्या तर्फे स्पर्धेचे सर्व डिजिटल बॅनर उपलब्ध केल्याबद्दल व सनी भाऊ अरोरा यांच्या तर्फे मंडप स्टेज करून दिल्याबद्दल,साईनाथभाऊ गिडगे यांच्या तर्फे डी.जे. ची सोय केल्याबद्दल तसेच मनमाड गुरुद्वारा प्रबंधक मा.बाबाजी रणजितसिंगजी यांच्या तर्फे सर्व सहभागी खेळाडू, क्रीडाशिक्षक,आयोजक यांच्यासाठी चहा,नाश्ता, व दुपारचे जेवणाची व्यवस्था करून दिल्याबद्दल मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,सचिव जाविद सर,कार्यवाहक देवेंद्र चुनियान यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच उपस्थित मान्यवरांचे राजाभाऊ जाधव,सनीभाऊ अरोरा,आकाश देवेंद्र चुनियान यांनी सत्कार केले. स्पर्धेतील सामन्याचे ऑनलाईन स्कोरर ओंकार ठोंबरे,सिद्धार्थ (भोला) रोकडे,पंच खलील कुरेशी,जाकीर शेख,अमित कांबळे यांचे सत्कार करण्यात आले.मनमाड क्रिकेट समितीने विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
