
राष्टीय : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरील देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR , थर्मल स्क्रीनिंग आणि चाचणी प्रक्रियेच्या सुविधांचा आढावा घेतला. माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्यमंत्री श्री मनसुख मांडवीयाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मंत्रालय जनसामान्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना काटेकोरपणे करत आहे.
