
मनमाड:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सामजिक न्याय व आधिकरिता राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचा 64वा वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीरचे आयोजन उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी चे युवानेते मा.वंदेशजी गांगुर्डे व दिया आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका शाळा छ.शिवजी महाराज चौक येथे आयोजीत करण्यात आला होता . सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मनमाड शहर पोलीस निरीक्षक श्री.प्रल्हादजी गीते साहेब यांनी केले तर प्रमुख उपस्थिती मनमाड नगर पलिकेचे मुख्याधिकारी श्री. सचिनकुमार पटेल,शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे ,कपिल तेलुरे आमदार प्रतिनिधी नांदगाव तालुका,शिवसेना शहर उपप्रमुख सुभाष माळवतकर,युवा सेना तालुका उपप्रमुख वाल्मिक निकम आदी उपस्थित होते.शहराच्या विविध भागातुन मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवीली.मोफत तपासणी मालेगाव चे तज्ञ डॉक्टरां मार्फत करण्यात आली तसेच अल्प दरात चश्मे देण्यात आले सुमारे 834 नागरिकांनी वरिल सुविधा चा लाभ घेतला. सदर कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगाव आमदार प्रतिनिधी कपिल तेलोरे यांनी केले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ओबीसी जिल्हाध्यक्ष गोरखसेठ चौधरी, व्यापारी आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष दिलीप बरडिया, व्यापारी आघाडीचे मनमाड शहर अध्यक्ष संजय मुनोत, वाहतूक आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष दीपक अहिरे, व्यापारी आघाडी मनमाड शहर संपर्कप्रमुख अनिल गुंदेचा आदींनी परिश्रम घेतले.
