
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर )
संपूर्ण देशात ग्रामीण भागातील शेतकरी शेळी पालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करतात.अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी आबासाहेब रामभाऊ महाडीक यांनी पंजाब मधून आनलेली”बिट्टल” या जातीची शेळी चक्क दोन हजार रुपयाला विकली आहे. आबासाहेब महाडीक यांचा मुलगा मेजर भरत महाडीक हा देशसेवेत सैनिक म्हणून पंजाब प्रांतात नोकरीला आहे. तेथे विकसित झालेल्या “बिट्टल” जातीच्या पंजाबी शेळीची त्यांनी खरेदी करून ती महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे आणली. तेथे तीचे योग्य प्रकारे संगोपन केले. तीची प्रसुती झाल्यानंतर तीला दोन,तिन,पाच अशीच(करडे) पिल्लं झाली. शिरापूर येथे”महाडीक गाँटफार्म”नावाने शेळ्यांचे संगोपन केंद्र सुरू केले आहे. आज आबासाहेब रामभाऊ महाडीक यांच्या एका पंजाबी शेळीची विक्रीची किंमत चक्क दोन लाख रुपये झाली आहे.हे इतर शेतकऱ्यांना ऐकून त्यांचा विश्वासच बसला नाही. परंतु हे खरे आहे. अहमदनगर येथील लालटाकी भागात राहणारे इरफान अकबर खान यांनी ही बिट्टल जातीची पंजाबी शेळी चक्क दोन लाख रुपये रोख देऊन खरेदी केली आहे. या खरेदी विक्रीच्या वेळी व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव बुधवंत,उपसरपंच नितीन लोमटे, भाउसाहेब गवारे, आदिनाथ पवार,निव्रुत मुख्याध्यापक राम शिंदे गुरुजी, सतिश दारकुंडे,मारूती बुधवंत गुरुजी, जयसिंग बुधवंत, शिवाजी महाडीक, विष्णु महाडीक,रावसाहेब महाडीक, दादासाहेब गवारे,हे उपस्थित होते.अहमदनगर येथील शेळी खरेदीदार व्यापारी इरफान अकबर खान,समिर खान,तौसिक शेख हे ही शेळी घेऊन नगरकडे रवाना झाले.. या बिट्टल जातीच्या पंजाबी शेळीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या जातीच्या शेळीच्या पील्लाची आकरा महिन्यात (११०)किलो वजना पर्यंत वाढ होते. एका वेताला तीन, चार,पाच अशीच पिल्ले होतात. एका तिन महिन्याच्या पिलाची किंमत पन्नास हजार रुपये होते. शेळी व्याल्यानंतर साधारण चार ते पाच लिटर दुध देते.चौदा महिन्यात दोन वेळा पिले होतात. महाराष्ट्रात या “बिट्टल” जातीच्या शेळीला जास्त प्रमाणात मागणी आहे. गावरान शेळीपेक्षा या शेळीपासुन जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या नगर जिल्ह्यातील शिरापूर येथील महाडिक गाँटफार्मला अवश्य भेट देऊन पहाणी करून आपला शेळी पालन व्यवसाय सुरु करावा अशी अपेक्षा देशसेवेत पंजाबात असलेले सैनिक मेजर भरत महाडीक मो.नंबर (7744860355) यांनी व्यक्त केली आहे.
(प्रतिनिधी सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा.)
