
येवला : आशा सेविकेला शिवीगाळ ,कारवाई ची मांगणी येवला तालुक्यातील बदापुर येथे आयुष्मान भारत योजनेचा माध्यमातुन गोल्डन कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले असता आरोग्याचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका आरोग्याचं काम घराघरात पोहचवत असते त्या अनुषंगाने येथे गोल्डन कार्ड काढून घेण्यासाठी माजी उपसरपंच यांना आशा स्वयंसेविकेने फोन केला असता गावाचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून उपसरपंच झालेल्या नागरिकाने आशा सेविकेला गैर शब्द वापरत शिवीगाळ केल्यानं तालुक्यातील आशा सेविका एकत्र जमा होऊन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शेख यांनी निवेदन दिले,यावेळी आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहून भविष्यात अशा प्रवृत्तीचा लोकांना वेळीच वरिष्ठ अधिकारी यांचाकडून समज देत असे प्रकार वारंवार घडु नये व गावातील नागरिकांनी स्वतः चा फायद्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी सहकार्याची भावना ठेवून मदत केली पाहिजे असेही गटविकास अधिकारी शेख यांना सांगण्यात आले यावेळी वंदना गुंजाळ , वर्षा भावसार, स्वाती चव्हाण, सुनिता सोनवणे, सुवर्णा बैरागी,वालहूबाई जगताप,संगीता राजगुरू,अश्विनी पानपाटील ,रंजना जाधव ,छाया पठारे ,कविता वाघ, करुणा घोडेराव यांच्या सह शेकडो आशा सेविका उपस्थित होत्या,
