
नाशिक : 17 डिसेंबर.रोजी अलसंन फौंडेशन च्या वतीने अपना करा ओके ग्रुपकडून कुसुमाग्रज स्मारक येथे एक ‘शाम शेहेंशा के नाम ‘कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.सतोष जी निकम होते ,तर प्रमुख अतिथी म्हणून मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष जेष्ट सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गीताताई गायकवाड उपस्थित होत्या अलसंन फौंडेशन च्या माध्यमातून गरीब अति गरीब वंचित घटकांना आर्थिक सामाजिक सहाय करण्याचा मानस आलाम खान यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गीताताई गायकवाड यांनी समाजातील वंचित बालकांना मदत करण्याचे आवाहन केले व व्यसनमुक्त सशक्त समाज बांधणीची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्ष निकम यांनीधर्मनिरपेक्ष समाज उभारणीची गरज असल्याचे सांगितले श्री. गणेश सुर्यवंशी सर यांनी सिद्धिविनायक शाळेच्या उभारणीचा प्रवास सांगितला श्री राजेश गोसावी सचिव अलसंन फौंडेशन यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा राजेश गिरी सर यांनी केले.
