मनमाड शहरात २४ अवैध तलवारींचा शस्त्रसाठा जप्त

0

मनमाड :  मनमाड शहरात २४ अवैध तलवारींचा शस्त्रसाठा जप्त मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मनमाड शहर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांनी मनमाड शहरातुन दत्तमंदिर रोडवरील मोठा गुपतसर गुरुद्वारा बाहेर लावलेल्या एका स्टॉलवरुन २३ अवैध तलवारी तसेच एका तरुणाच्या  ताब्यातुन ०१ असा एकुण अवैध २४ तलवारीचा शत्रसाठा जप्त केला आहे . याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्हयात अवैध २४ तलवार व एक मोटारसायकल असा एकुण ९ ०,००० रुपयाचा मुद्देमाल दप्त केला आहे . सदर प्रकरणी संदिप बाळासाहेब पवार राहणार वडगांव पंगु ता.चांदवड जिल्हा नाशिक व चरणसिंग s/o भुपिंदरसिंग वय २७ वर्ष राहणार न्यु कोट , आत्माराम , सुलतानविंड रोड , अमृतसर या दोन इसमांना तलवार बाळगतांना तसेच विक्री करतांना आढळुन आल्याने ताब्यात घेण्यात आलेले आहे . सदरची कारवाई मा . श्री बी जी शेखर , विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र , मा.श्री.शहाजी उमाप , पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण , मा . श्री . अनिकेत भारती , अपर पोलीस अधिक्षक , मालेगांव , मा . श्री समिरसिंह साळवे , उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रल्हाद गिते . पो.ना, गणेश नरोटे , पो.शि, गौरव गांगुर्डे , पोशि राजेन्द्र खैरनार , पो.शि, रणजित चव्हाण चांदवड पोलीस स्टेशन कडील पोहवा पालवी , पो.शि. उत्तम गोसावी यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here