
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांड्यावर भव्य सभामंडप मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व सभामंडपांचे भूमिपूजन आमदारांच्या सूविद्य पत्नी सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर व रविवार दिनांक 27 नोव्हेंबर या दोन दिवशीय कार्यक्रमात हे सर्व भूमिपूजन करण्यात आले. गावा गावात फटाखे, ढोल ताशांच्या गजरात, अती उत्साहात, मोठ्या संख्येने नागरिकानी गर्दी करत सौ.अंजुम ताई कांदे यांचे स्वागत केले. सौ.अंजुम कांदे या प्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक गावात नागरिकांशी संवाद साधला. आमदार साहेब सतत मतदार संघाच्या विकासाकरिता जागरूक आहेत, आम्ही सर्व प्रत्येक सूख दुःखात आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सभामंडप सह स्वखर्चातून प्रत्येक आदिवासी वस्तीवर भगवान एकलव्य मूर्ती तसेच बंजारा तांडा वस्तीवर संत सेवालाल महाराजांची भव्य दिव्य आकर्षक अशा मूर्ती भेट दिली. लवकरच या सर्व मूर्त्यांची या सभामंडपात स्थापना करण्यात येणार आहे. काही दिवस पूर्वी आमदारांच्या माध्यमातून या सर्व मूर्ती चे मूर्ती पूजन व समाज बांधव सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात घेण्यात आला होता.
तळागाळातील दुर्लक्षित समाजाप्रती आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दाखवलेली सामाजिक आपुलकी या बद्दल तालुक्यातील जनता कौतुक करताना दिसत आहे. या प्रसंगी सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी, महीला आघाडी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
