जिल्हा मजूर संघ निवडणूक नांदगाव मधुन प्रमोद भाबड बिनविरोध विजयी

0

नाशिक : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन च्या पंचवार्षिक निवडणुकीत नांदगाव तालुका प्रतिनिधी म्हणून गुलाबभाऊ उर्फ प्रमोद सुदामराव भाबड यांची आज बिनविरोध निवड झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हरेश्वर सुर्वे ,व अनुजा सुशेन आहेर यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने श्री गुलाब भाऊ भाबड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. या प्रसंगी तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी प्रमोद भाऊ भाबड यांचे अभिनंदन केले, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्ञानदेव भाऊ आहेर, हरेश्वर सुर्वे, नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास भाऊ आहेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण दादा देवरे, नगराध्यक्ष राजेश कवडे, जी. प. सदस्य रमेश काका बोरसे, माजी सभापती सुभाष कुटे, विष्णू निकम सर, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर भाऊ लहाने, नांदगाव नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज दादा कवडे माजी उपसभापती राजेंद्र सांगळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर संजय सांगळे, मनमाड चे माजी नगराध्यक्ष योगेश उर्फ बबलू भाऊ पाटील, संजय आहेर, अविनाशभाऊ इप्पर, सुनिल शेलार राजेंद्र पवार, अमोल शेठ नावंदर, राजेंद्र देशमुख, आनंद शेठ कासलीवालआदि यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here