
सिल्लोड प्रतिनिधी( विनोद हिंगमिरे) रामकृष्ण माध्यमिक विद्यालय सिल्लोड येथे दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी औरंगाबाद भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय तालुकास्तरीय संघनायक मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन रामकृष्ण विद्यालयाचे प्राचार्य श्री पठाण सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य श्री.मुरमे सर,जिल्हा संघटक श्री श्रीनिवास मुरकुटे, तालुका प्रतिनिधी श्री.विठ्ठल पुरी, श्री. मेटे सर, श्री.काझी सर, श्री.शेळके सर, श्री.बारस्कर सर, श्रीमती. वायसाळ मॅडम ,श्री हरचंद जारवाल इत्यादी उपस्थित होते. सदरील मेळाव्यात तालुक्यातील विविध शाळेमधून 168 स्काऊट गाईड व स्काऊटर गाईडर सहभागी झाले होते. मेळाव्याच्या प्रथम सत्रात ध्वजारोहणापासून सुरुवात करण्यात आली. प्रवेश अभ्यासक्रमातील सर्व बाबी सदरील मेळाव्यात शिकवण्यात आल्या तसेच गाठींचा सराव, प्रथमोपचार, कृतीयुक्त गाणे, खेळ इत्यादी देखील घेण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदरील संघनायक मेळावा पार पडला. सहभागी सर्व सदस्यांना प्रमाणपत्र देत समारोप करण्यात आला शेवटी विठ्ठल पुरी सर यांनी आभारप्रदर्शन केले.
