शिवशक्ती फर्निचर- स्टील-प्लॅस्टिक उद्योग समुहाचा शेवगाव येथे शुभारंभ संपन्न

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) जिल्ह्यातील शेवगाव येथे शिवशक्ती प्लॅस्टिक उद्योग आणि शिवशक्ती फर्निचर, इलेक्ट्रॉनिक स्टीलभांडी भांडार या दोन्ही दालनाचा शुभारंभ कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर गेवराई रोडरील शेवगाव येथील दालनात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनशक्ती मंचचे प्रमुख संस्थापक अँडव्होकेट शिवाजीराव काकडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे व्हा. चेरमन सुरेशराव होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे,फर्निचर उद्योजक सोपानराव शिकारे, घोडेगावचे कांद्याचे व्यापारी सुदामराव तागड मामा, काळे पतसंस्थेचे चेरमन अशोकराव काळे हे होते. शिवशक्ती उद्योग समुहाच्या पाचव्या दालनाचा हा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. अँडहोकेट शिवाजीराव काकडे, आणि सुदामशेट तागडमामा यांच्या हस्ते फीत कापून या दालनात पदार्पण करण्यात आले.प्रारंभी शिवशक्ती उद्योग समुहाचे व्यवस्थापक आणि जेष्ठ नेते जगन्नाथ गावडे यांनी प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त केले.आम्हीबी कसे घडलो याबाबत सविस्तर माहिती दिली.शेवगाव तालुक्यात काकडे-गावडे या राम-लक्ष्मणाच्या जोडीने एकमेकांच्या सहकार्याने आता पर्यंत शिवशक्ती मशिनरी, शिवशक्ती क्रुषीसेवा केंद्र, शिवशक्ती आँइलमील, शिवशक्ती मिल्क प्राँडक्ट,आणि शिवशक्ती स्टील फर्निचर, प्लॅस्टिक अँड इलेक्ट्रॉनिक या पाच उद्योगात यशस्वी भरारी घेतली आहे.जगन्नाथ गावडे दादा यांच्या कारकिर्दीची सुरुवात म्हणजे माळेगावच्या सरपंच पदापासुन तर थेट एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी मागे वळून न पाहता गगन भरारी घेत आपल्या कामाचा ठसा संपूर्ण शेवगाव तालुक्यात उमटवला आहे.अनेक गोरगरिबांच्या छोट्या मोठ्या कामातून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आहे.या शुभारंभ सोहळ्यासाठी भाजपाचे जिल्हा नेते अरुण मूंडे, नगरसेवक बंडूशेट रासने,शेतकरी संघटनेचे नेते दत्ता फुंदे, भेंडा कारखाना येथील ज्ञानेश्वर फर्निचर शेती औजारे कंपनीचे संस्थापक बापुसाहेब नजन,मनसेचे नेते गणेश रांधवणे,मार्केट कमिटीचे सदस्य बप्पासाहेब लांडे,वाघोली दुधसंस्थेचे चेरमन दत्तू दातीर, काष्टीचे दत्ताशेठ गावडे,सांगवी सासायटीचे चेरमन सुभाष आंधळे,राक्षीचे चेरमन किसनराव झूंबड,ग्रामविस्तार अधिकारी नारायण नजन, अँडहोकेट जाधव साहेब, मराठे साहेब, अँडहोकेट गलांडे भाउसाहेब, ग्रामसेवक नजन भाउसाहेब, निव्रुत मुख्याध्यापक जयराम सुडके,दातीर मामा,जनशक्ती परिवारातील संभाजी गावडे,माळेगावच्या मा.सरपंच सौ.सुमनताई गावडे,भिमराव भा.गावडे,मच्छिंद्र ढाकणे आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून आलेले यशस्वी उद्योजक मांन्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन दिपक कुसाळकर यांनी तर आभार सुधाकर भिसे यांनी मानले.एकादशीच्या फराळाने या सोहळ्याची सांगता झाली. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here