
गुजरात : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गुजरात कापरपाडा विधानसभा उमेदवार श्री. जीतूभाई पटेल यांच्या प्रचार सभे दरम्यान मोटपौंध,करमखाल,नानापौंध या गावात भेट देऊन पदाधिकारी-कार्यकर्ता, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख,यांची महत्वपूर्ण बैठक घेतली व भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राने आदिवासी समाजाचा विकास करणे हे भाजपचे प्राधान्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला प्रामुख्याने कपराड़ा विधानसभेचे प्रभारी श्री करशनभाई गोंदलिया, पर्यटक श्री दिलीपभाई पटेल, विस्तारक श्री पार्थभाई पटेल, तालुका भाजपा अध्यक्ष श्री सुरेशभाई पटेल, तालुका पंचायत अध्यक्ष श्रीमती वसंतीबेन पटेल, महिला एवं बाल विकास अध्यक्ष श्रीमती मो. रंजनबेन पटेल, यांच्यासह स्थानिक भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, बूथ पदाधिकारी, शक्ति केंद्र प्रमुख व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
