श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी कँडल मार्च मोर्चा

0

मनमाड : दिल्ली येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे मुंबईतील रहिवासी श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.आफताब पूनावला या नराधमाने अतिशय क्रूरतेने हि हत्या केली त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांचे ह्रदय हेलावून गेले अश्या ह्या क्रूरकर्मा आफताब पुनावाला या नराधमास भररस्त्यात फाशी द्यावी व श्रद्धा वालकरच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्याकरिता बाळासाहेबांची शिवसेना दी २१/११/२०२२ सोमवार रोजी सायं ६:३० वा. गांधी चौक मनमाड येथून कँडल मार्च मोर्चा निघणार आहे.
तरी मनमाड शहरातील सर्व जाती धर्माच्या महिला व पुरुषांना विनंती करण्यात येते की मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रद्धाताईस न्याय मिळवून देण्याकरिता तसेच आफताब पूनावाला या नराधमास कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीता सर्वांनी एकत्र यावे, हि विनंती.

— आपला —
बाळासाहेबांची शिवसेना
युवासेना / महिला आघाडी
व सर्व अंगीकृत संघटना
मनमाड शहर शाखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here