श्रद्धा वालकर हत्याकांड आरोपीचा मनमाड शिवसेना महिला आघाडी तर्फे जाहीर निषेध

0

मनमाड : शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने वसईच्या श्रद्धा वालकर या युवतीच्या झालेल्या निर्घृण हत्येचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.वसई येथील सुशिक्षित युवती श्रद्धा वालकर ला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिने केलेल्या लग्नाच्या मागणीस नकार देऊन तिची एका जनावर प्रमाणे तिची निर्घृण हत्या केली, शिवाय खुणा नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून आफताफ पूनावाला नावाच्या प्रियकरांने ते सर्व जंगलात फेकून दिले. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार असून, अशा विकृत मनोवृत्तीचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही जळजळीत निषेध करीत आहोत. महिला तसेच युवतीच्या बाबतीत अनेक कायदे असतानाही गुन्हेगारांना त्यांची भीती वाटेनाशी झाली आहे अशा मानसिकता असणारे विकृतांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे महिलांच्या बाबतीत काळजीपूर्वक धोरण अवलंबने गरजेचे आहे. या नराधमास लवकर तपास पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आवश्यक पुरावे जमा करावे व व त्याला लवकरात लवकर फाशी ची शिक्षा द्यावी.मनमाड शहर महिला आघाडीच्या या वतीने असे विकृत प्रकृतीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असे पत्र मनमाड शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी सगीता बागुल ,कल्पना दोंदे, विद्या जगताप, पूजा छाजेड, सरला गुगळे, सुरेखा ढाके, प्रतिभा अहिरे, नीता लोंढे, संगीता घोडेराव नितु  परदेशी, अल्का कुमावत  उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here