
पुणे : केंद्र व राज्य स्तरावर शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ मिळावा असे त्यांनी सांगितले. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विविध योजनेंचा लाभ हा समाजाच्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.देशाच्या पंचायत राज व्यवस्थेतील सरपंचांना एक अराजकीय सर्वसमावेशक व्यासपीठ सरपंच संसदेच्या माध्यमातून साकारले आहे ग्रामविकासासाठी उपयोगी होणारी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे कुठलाही भेदभाव न ठेवता केवळ ग्राम विकासाची निश्चित दिशा घेऊन सरपंचांनी संघटीत होणे, एकत्रित प्रयत्नातून शासकीय धोरण आणणे आणि योजनांची अंमलबजावणी करणे आणि कृतिशील राष्ट्रीय एकात्मता साधने ही गरज सरपंच संसद व्यासपीठावरून पूर्ण होईल असे डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी मा. राहूल जी कराड, योगेश जी पाटील, ज्ञानेश्वर बोडके, प्रकाश जी महाले, व्यंकटेश जी जोशी, सरिता ताई गारवरे, डॉ.नामदेवराव गुंजाळ, बाजीराव खैरनार यांच्यासह समस्त सरपंच बांधव उपस्थित होते.
