मनमाड शहरात मतदार नोंदणी अभियानाची उत्स्फूर्त सुरुवात

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेतर्फे शनिवार व रविवार या दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियानाची आज सुरुवात झाली.
मनमाड शहरातील नागरिकांना मतदार नोंदणी आधार लिंक करणे या सर्व प्रक्रियेसाठी सहज सोय व्हावी म्हणून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनानंतर शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी व सदस्यांनी आज दिनांक 19 नोव्हेंबर शनिवार रोजी व उद्या 20 नोव्हेंबर रविवार रोजी दोन दिवसीय मतदार नोंदणी व आधार लिंक करणे अभियानाचे आयोजन केले.
आज शनिवारी मनमाड मधील 15 ठिकाणी या अभियाना अंतर्गत मंडप टाकून भूत उभारण्यात आला या ठिकाणी बी एल ओ सहित मनमाड शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी नागरिकांना फॉर्म उपलब्ध करून दीले, तसेच भरून देणे आम्ही सहकार्य केले.मतदार नोंदणी अभियानास मनमाड शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत या ठिकाणी गर्दी केली.नागरिकांच्या मतदार नोंदणी आधार लिंक करणे या संबंधित कामे सहज सोपे झाल्यामुळे नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानत
आनंद व्यक्त केला.मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन मनमाड शहर शिवसेनेने केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here