वाहन चालक-मालक संघटनेची आमदार सुहास (आण्णा) कांदे संपर्क कार्यालय बैठक.

0

मनमाड : मनमाड शहरातील रिक्षा – टॅक्सी व इतर वाहन चालक मालक यांच्या अडचणी संदर्भात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे बैठक आयोजित करण्यात आली. विविध विषयावर त्यांना मार्गदर्शन करुन भविष्यातील अडचणी दूर करण्याकरिता सर्वांनी आपल्या वाहनांचे कागदपत्राची पूर्तता करुन शासनास सहकार्य करावे. चालक – मालक यांच्या सामाजिक व इतर अडचणीत आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे बैठकीत आश्वासित करण्यात आले.त्यावेळी उपस्थित बाळासाहेबांची शिवसेनेचे जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनिलभाऊ हांडगे, माजी नगरसेवक गालिब शेख, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक विकास वाघ, वाहतूक सेनेचे अमजद शेख, कोअर कमिटी सदस्य दादाभाऊ घुगे, सुभाष माळवतकर, लाला नागरे, महेंद्र गरुड, आशू पोहाल, केतन जाधव, सचिन दरगुडे, कृष्णा जगताप, कुणाल विसापुरकर, कलश पाटेकर, हरिष केकान, नंदु पिठे व मोठ्यासंख्येने सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here