
मुंबई (लालबाग – प्रतिनिधी-संचित यादव)
लालबाग परळ मधिल प्रसिद्ध अशा गोदरेज मैदानात रंगकर्मी शिलेदार आणि भावकादेवी प्रॉडक्शन आयोजित दिनांक १६ नोव्हेंबर रोजी कलाकार क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे यांच्या शुभहस्ते या क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील कलाकारांचे एकूण ६ संघ आले होते त्यात प्रामुख्याने भावका देवी प्रॉडक्शन, आंबेडकर कॉलेज, कांबळे ब्रदर्स, आंम्रे वॉरियर्स आणि क्रिएटिव टीम यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आम्रे वॉरियर्स तर द्वितीय क्रमांक क्रिएटिव्ह टीम यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. रंगतदार आणि मनोरंजक अशा या स्पर्धेसाठी सॅप प्रॉडक्शनच्या निर्मात्या संगीता किल्लेदार आणि नगरसेवक सचिन पडवळ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी अंतिम विजयी, अंतिम पराभूत तसेच उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण आणि मॅन ऑफ द मॅच विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली. त्याचबरोबर महेश्वर तेटांबे यांच्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रॉडक्शन तर्फे थर्मासचे वाटप करण्यात आले. अशा तऱ्हेने खेळीमेळीने आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न झाली.
