
अहमदनगर : (सुनिल नजन/स्पेशल क्राईम रिपोर्टर) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील साठ महिलांनी आणि १०५ पुरुषांनी सह्या केलेले निवेदन आणि ग्रामपंचायती मध्ये दि.३१आँगष्टला झालेल्या मासिक मिटींगच्या ठरावाची प्रत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये आडगावातील जुगार, मटका, आणि दारुबंदी व्हावी म्हणून महिलांनी पाथर्डी पोलिसांना साकडे घातले आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात मध्ये प्रामुख्याने सरपंच जगन्नाथ लांढे, उपसरपंच सौ.सखुबाई गोपिचंद गर्धे,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुखदेव शेंडे,ग्रामपंचायत सदस्य सोन्याबापू लोंढे,आदिनाथ भानगुडे,रंगनाथ लोंढे,संभाजी लोंढे,राधू लोंढे,आदिनाथ लोंढे,बाळासाहेब कोळसे,नाना पडळकर,पुष्पा राम म्हस्के, पुष्पा जिजाबापू ढेकळे,समाबाई श्रीमंत लोंढे,अनिता रावसाहेब लोंढे,लंका राधाकिसन लोंढे,अनुष्का सुभाष सोन्नर,मनिषा सुभाष खेमनर,सुनिता अरुण भानगुडे, मंगल त्रिंबक भानगुडे, सिताबाई लक्ष्मण लोंढे,प्रियंका बाळासाहेब लोंढे,हौसाबाई सुखदेव भानगुडे यांचा समावेश होता.पाथर्डी पोलीस स्टेशनचे मीरी बीटचे पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण मीरी जिल्हा परिषद गटाचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी सुनिल नजन,जिल्हा, स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर.
