
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी तुळजाभवानीचे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे आहे. स्व.तुकाराम गोविंद म्हस्के यांनी पंचावंन्न वर्षापुर्वी या मंदिराची स्थापना केली होती. त्यांच्या कासार पिंपळगाव येथील मातीच्या घरात दोन फुट खोल खड्यात ही देवीची मूर्ती सापडली होती. स्व.तुकाराम म्हस्के यांनी त्या वेळी ग्रामस्थांना सांगितले की तुळजाभवानी स्वप्नात येउन द्रुष्टांत दिला घरात मी भुमिगत आहे मला घराबाहेर काढा.मग देवीची गावातून मिरवणूक काढून म्हस्के यांनी स्व.दादापाटील राजळे यांचे वडील स्व.शंकरपाटील राजळे यांच्या घरी सालगडी म्हणून काम करत हे छोटे मंदिर बांधले होते. आता भाविकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन मंदिर आणि सभामंडपाचे काम प्रगतीपथावर आहे.आता या मंदिराची सेवा बाळासाहेब म्हस्के आणि शेषनारायण म्हस्के हे करीत आहेत.अनेक भाविकांची नवसापुर्ती झाल्यामुळे आमावस्या, पौर्णिमा, मंगळवार शुक्रवारी भाविकांची मंदिरात गर्दी होते.पंचक्रोशीतील भाविकांनी या मंदिर जिर्णोद्धाराला सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन बाळासाहेब म्हस्के आणि शेषनारायण म्हस्के यांनी केले आहे.
(प्रतिनिधी, सुनिल नजन)अहमदनगर
