भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

0

मनमाड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत अशोक मगर चषक राज्यस्तरीय फुटबॉल सर्धा २०२२ दिनांक १९ऑक्टोबर ते २३ऑक्टोबर २०२२ या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण मनमाड येथे संपन्न होणार आहे.सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक चे बक्षिस रु.३१०००/- व चषक माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ धात्रक व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे ओपन लाईन शाखा चे कार्यालय सचिव निलेश इंगळे यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.व्दितीय क्रमांक चे बक्षिस रू २१०००/- व चषक मा.नगरसेवक बब्बु कुरैशी व राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.
तृतीय क्रमांकाचे बक्षिस रू ११०००/- व चषक मा नगरसेवक संजय निकम व सन्नी अरोरा यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.चतृर्थ क्रमांक चे बक्षिस रू ७०००/- व चषक इम्रान मोमिन व इरफान मोमिन यांच्या कडून देण्यात येणार आहे. या आयोजनासाठी मा नगरध्यक्ष राजाभाऊ पगारे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले आहे.
तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू चषक ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर यांच्या कडून देण्यात येणार आहे.
तसेच अंतिम सामन्यातील सर्व चषक ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे ओपन लाईन शाखाचे कार्यकारिणी सदस्य वसंत सोनवणे यांच्या कडून देण्यात येणार आहे.अशी माहिती पत्रकाद्वारे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मनमाड बॉईज चे रहिम पठाण, विलास शिरूड,गोपी जगधने,मोसिम खान राहुल सातदिवे आदीने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here