कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

मालवण (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-ग्लोबल रक्तदाते मालवण,कोळंब पंचक्रोशी मालवण,राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ सिंधुदुर्ग कोळंब शाखा,आणि ग्लोबल रक्तवीरांगणा मालवण यांच्या वतीने हाॅटल मालवणी,कोळंब येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी ५१रक्तदात्यांनी रक्तदान केले.गावागावातुन रक्तदान जनजागृती करुया,चला रक्तदान करुया.असे सागंत रक्त पेढीतील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये अति दुर्मिळ बाॅम्बे ब्लडग्रुप टेस्ट ही करण्यात आली.रक्तदान शिबिर आयोजनात सौ.नेहा कोळंबकर,अमेय देसाई,राजू बिडये,अंकुश कातवणकर,प्रियाल लोके,सौ.प्रतिमा भोजणे,सौ.सिया धुरी,सौ.राधा केरकर,सौ.माधुरी नेमळेकर,संदीप शेलटकर,दाजी कोळंबकर,जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांसह अन्य सहकारी व आयोजक संस्था सदस्य यांनी शिबिर आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.लायन्स क्लब यांचेही सहकार्य लाभले.यावेळी अनिल निव्हेकर,अवि नेरकर,कोळंब सरपंच प्रतिमा भोजणे,समीरा बांदेकर,दीपक ढोलम,विजय ढोलम,राजा शंकरदास,वैशाली शंकरदास,प्रियाल लोके,निखिल नेमळेकर,माधुरी नेमळेकर,अपूर्वा लोके,राजू हडकर,पुरुषोत्तम भोजणे,अंकुश कातवणकर,राजू बिडये,संदीप पेडणेकर यासह अन्य मान्यवर व सहकारी उपस्थित होते.वैद्यकीय अधिकारी विष्णु खरात,रक्तपेढी तंत्रज्ञ प्रशांत सातार्डेकर,सौ.बागेवाडी,राहुल जाधव,अनिल खाडे यांनी रक्तदान शिबिरासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.सर्व रक्तदाते,कोळंब ग्रामस्थ व उपस्थितांचे आयोजकांच्यावतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here