
वासोळ 🙁 पत्रकार प्रशांत गिरासे मो 9130040024 )
दिनांक 13/8/2022 शनिवार रोजी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा रेवाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे , भारतीय आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे .मा.केंद्र शासनाच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात 13/8/2022 ते 15/82022 या कालावधीत हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आज रोजी आश्रम शाळेतील ध्वजारोहण, कुमारी, प्रियंका जामसिंग पावरा इयत्ता दहावी या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस नाईक( पोलीस स्टेशन चिमठाणा ) यांनी उपस्थिती दिली. तसेच शाळेच्या अध्यक्षा ताईसो सुंदरबाई रमेश मालचे आणि शाळेचे उपाध्यक्ष बापूसो रविंद्र रमेश मालचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री.व्ही. ए.पाटील सर प्राथमिक मुख्याध्यापक श्री.आर.ए.पवार सर उपस्थित होते. नंतर सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी गावातुन तिरंगा रॅली काढण्यात आली.
