डॉ उदय निरगुडकर यांना यंदाचा आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार घोषित

0

मुंबई : आचार्य प्र के अत्रे स्मारक समितीच्या वतीने पत्रकारितेच्या महत्वपूर्ण योगदानासाठी देण्यात येणारा यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार आज घोषित करण्यात आला आहे. स्मारक समितीच्या अध्यक्षा ऍड आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी त्याची घोषणा वरळी येथे आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती दिनी केली आहे. लवकरच समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.डॉ निरगुडकर यांनी पुणे विद्यापीठातून एम.बी.ए. केल्यानंतर मार्केटिंगpp मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. निरगुडकर यांना दोन दशकांहून अधिक काळ आय.टी., प्रिंटिंग, शैक्षणिक क्षेत्र, इन्फ्रास्टक्चर, पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी अग्रगण्य आयटी कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रमुख पदावर तसेच ५० हून अधिक देशांत शैक्षणिक क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन कौशल्य यांतील विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत.
Strategic use of IT, TQM, Business Process Reengineering या विषयांवरील ४ पुस्तकांचं संकलन व ” लोकल ते ग्लोबल ” जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा आणि All about winning Indian Elections या पुस्तकांचे, तसेच C.E.O. या कादंबरीचे लेखन केले आहे. झी २४ तास , ‘न्यूज18 लोकमत’ या वृत्तवाहिन्यांचे व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली आहे. पत्रकारिते मध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवे उपक्रम सुरू केले  . सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळेच ” धागा शौर्य का , राखी अभिमान की ” आणि सैनिकांच्या कुटुंबांबरोबर दिवाळी साजरी करत ” आपला सैनिक , आपली दिवाळी ” हे उपक्रम सुरू केले . अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला . पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम चैनल वरून लोकप्रिय बनवले. २६/११ च्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या Force One या कमांडो युनिटसाठी प्रशिक्षण शिबीरं घेतली.
शास्त्रीय संगीताचे अनेकविध कार्यक्रम करून कलेची जोपासना केली आणि त्यासाठीच NCPA आणि संगीत नाटक अकादमी तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला .सध्या देश विदेशातील विद्यापीठ , संशोधन संस्था मध्ये कार्यरत .. NHPC हया भारत सरकारच्या महत्वाकांक्षी नवरत्न प्रकल्पात स्वतंत्र संचालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here