यादगार सोशल फाउंडेशन तर्फे विध्यार्थी व मुस्लिम समाजाला तिरंगा वाटप

0

येवला : आझादीचा अमृत महोत्सव निमित्त यादगार सोशल फाउंडेशन तर्फे ईकरा अरबी मदरसा या शाळेत तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काजी सलीम उद्दीन मिजबाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याप्रसंगी तहसीलदार येवला प्रमोद हिले, जेष्ठ स्वातंत्र सैनिक मेजर कचरू साळवे, ब्रम्ह कुमारी सेंटरच्या प्रमुख नीता दिदी , शहर काजी सलिमुद्दीन मिस्बाही ,दादाभाई फिटर,ईकरा अरबी मदरसाचे प्रमुख अझहर शहा , यादगार सोशल फौंडेशन अध्यक्ष शाकिर शेख,आदींची उपस्तीती होती तसेच यादगार सोशल फाउंडेशन तर्फे मुस्लिम समाजातील घराघरात तिरंगा ध्वज वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शाकिर शेख यांनी सांगितले. दि १३/८/२०२२ पासून १५/८/२०२२ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. ईकरा अरबी मदरस्या मध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली तहसीलदार प्रमोदिले यांनी संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व घर घर तिरंगा अभियानात सर्वांनी उत्साहात सहभागी व्हावे असे आवाहन केले याठिकाणी, पाटील दादा, संतोष गायकवाड, अश्विनी जगदाळे, अक्रम शेख ,निदा शेख, शबिस्ता मंसुरी ,नुसरत शेख ,आफिया अन्सारी, आवेश पिंजारी, अजर अन्सारी, दर्शन भिंगारकर आदीसहसंदीप दारुंटे पालक व नागरिक उपस्तीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here