सामाजिक प्रश्नांची जपणूक करणारा नेता हरपला

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंद्रपूर : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यू ची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे . सामाजिक प्रश्नांची अत्यंत संवेदनशीलपणे जाण ठेवून , जपणूक करून त्यासाठी लढणारा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे .मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो कि त्यांच्यावर देण्यात आलेली शिवछत्रपती स्मारकाची जबाबदारी, सतत झपाटल्यगत काम करणारा हा नेता कार्यकर्त्यामध्येही जिव्हाळ्याचा माणूस म्हणून लोकप्रिय होता .विधिमंडळात सजग व अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ राहिला.
श्री विनायक मेटे यांचे अपघाती निधन म्हणजे राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे नुकसान तर आहेच पण त्यांचे कुटुंबीय , शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर मोठा आघात आहे . ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना व श्री विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here