
मनमाड : शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी म.रे.मा विद्यालयातिल विद्यार्थांचे दंतरोग तपासणी शिबिर रोटरी क्लब मनमाड तर्फे घेण्यात आले. शााळेमधिल एकूण ५२७ विद्यार्थांची ओरल स्क्रिनिंग तसेच दंत तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३०८ विद्यार्थांना डेंटल केरीज्स चे निदान झालें. सर्व विद्यार्थांना टूथपेस्ट देऊन ओरल हाइजिन ठेवण्यास प्रोत्साहीत करण्यात आले.के.बीं.एच डेंटल कॅालेज,नाशिक येथिल ६ डॅाक्टरांच्या टिमसहित मैथिली डेंटल क्लिनिक, मनमाड तर्फे चेकअप करण्यात आले.ह्या प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुजराती सर, रोटे. गुरजीत कांत, रोटे.आनंद काकडे, रोटे लैाकुमार माने, रोटे. राजू गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका कुंझरकर मॅडम, शिक्षकवृंद आदी. उपस्थित होते.
