खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या विद्यमाने कोंकणवासीयांसाठी मोफत एस टी सेवा

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण – या वर्षी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विनामुल्य एस. टी. प्रवास सेवा उपलब्द करून देण्यात येणार आहे . या सेवेचा लाभ जास्तीत जास्त चाकरमाणी गणेशभक्तांनी घेण्याचे आवाहन कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले आहे .गेली दोन वर्षे कोरोना संकरामुळे अनेक गणेशभक्त कोकणवासीय चाकरमान्यांना आपल्या मुळ गावी गणेशोत्सवासाठी जाता आले नाही. परंतु या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या वर्षाचा गणेशोत्सव कसल्याही निर्बंधाशिवाय संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. हाच गणेशोत्सव आपल्या मुळ गावी जावून साजरा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातील चाकरमान्यांना विनासायास गावी जाता यावे या साठी कल्याण पूर्वेतून सिंधुदूर्ग, रत्नागिरी रायगड या बरोबर सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जाण्यासाठी विनामुल्य बस सेवा उपलब्द करून देण्यात येणार आहे . या सर्व एस टी बसेस २८ ऑगष्ट रोजी कल्याण पूर्वेतून सुटणार आहेत.या सेवेचा लाभ घेणाऱ्या इच्छुकांनी १५ आँगष्ट पर्यंत आपल्या प्रवासाची अधिकृत नोंदणी पुणे लिंक रोड, गुंजाई चौक येथे असलेल्या मा. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते १ तसेच सायं ६ ते ८ या वेळेत करण्याचे आवाहन महेश गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here