येवला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

0

येवला:लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती, अण्णा भाऊ साठे प्रवेशद्वार येवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.उपस्थित मान्यवर व समिती सदस्य यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.बार्टीचे समतादूत चंद्रकांत इंगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य, सामाजिक विचार, साहित्य संपदा व त्यांच्या विचारांची गरज, समाज कल्याण विभागाच्या योजना व बार्टीच्या योजना या विषयी मार्गदर्शन केले.घडीपुस्तिका वाटप केल्या.यावेळेस उपस्थित मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले.यावेळी अमोल खैरनार,योगेश लोखंडे, राजस पोळ, मयूर आव्हाड, विकास खैरनार,सांगा लोखंडे, मयूर खैरनार,राहुल पोळ,अनिल खैरनार, अजय करणार, शंकर खैरनार, पंकज खैरनार, गोरख लोखंडे, नवनाथ पोळ, खंडू खैरनार,ज्ञानेश्वर खैरनार, लक्ष्मण लोखंडे,श्रावण खैरनार, भारत शेलार, मेजर किरण अहिरे,युवराज पगारे, बाळा कसबे, आकाश भालेराव,तूपसुंदर सर, अण्णाभाऊ साठे नगर मधील नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here