मनमाड शहरात गर्दीचा महापूर अभूतपूर्व उत्साहात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे स्वागत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित

0

मनमाड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी एकात्मता चौक मनमाड येथे आज करंजवण योजनेचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी या योजनेचे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजना असे जाहीर केले. याव्यतिरिक्त लोकसहभागातून लागणारा दहा टक्के निधी नगर विकास खात्यातून दिला जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या साधेपणामुळे नागरिकांचे मन जिंकले.
याप्रसंगी शिंदे साहेबांचे भगवी विशाल व चांदीची गदा देऊन आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूमताई कांदे यांनी जाहीर सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार केला.विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here