संजय गांधी योजनेतील आय टी असिस्टंट संघटने चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कुणाल शिरसाट यांच्या कडुन मुख्यमंत्री यांना विविध मागणीचे निवेदन

0

वासोळ ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ ) संजय गांधी योजनेतील आय टी असिस्टंट यांच्या मानधन व पदा बाबत उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की आम्ही 419 आय टी असिस्टंट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी योजनेत महाराष्ट्रात प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय प्रत्येकी एक असे आम्ही महाराष्ट्रात 419 आय टी असिस्टंट आहोत तरी आम्ही NSAP पोर्टल चे लाभार्थींची महिन्याला आलेले अर्ज मंजुरी साठी ठेवणे व शासनाकडून आलेले अनुदान लाभार्थ्यांना वेळेत वाटप करणे हे काम आम्ही प्रामाणिक पणे करीत आहोत. तरी आम्हाला ११८०० इतके मानधन आहे. ह्या मानधनात कुटुंबाची आर्थिक उपजीविका भगत नाही तरी आमच्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही मंजूर करणार अशी मी अपेक्षा करतो.

१) आम्ही गेली 10 वर्षा पासून एवढ्या कमी मानधनात जास्त काम करीत आहोत तर आम्हाला शासन सेवेत सामावून घ्यावे.

२) शासन सेवेत लगेच सामावून घेणे शक्य नसेल तर आम्हाला तत्पर आय टी महामंडळात सामील करावे.

३) ११८०० ह्या मानधनात वाढ होऊन किमान वेतन कायदा लागू करून २७००० इतके मानधन मिळावे.

४) आय टी असिस्टंट या पदासाठी सुरक्षा मिळावी जेणे करून अधिकारी बदली झाल्यावर आम्ही जुने लोक काढून नवीन लोक भरता येणार नाहीत.

५) मागील वर्षी फेब्रुवारी २०२१ ते ऑकटोबर २०२१ या 7 महिने कंपनी चे कॉन्ट्रॅक्ट संपले होते तरी आम्ही लोक कोरोना काळात कार्यालयात जाऊन काम केलेली आहेत ते 7 महिन्याच मानधन आम्हाला मिळाव

६) आमच्यातील 3 लोकांचा कोरोना काळात कार्यालयात जात असताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना प्रतेकी १०००००० इतकी शासणा कडून मदत मिळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here