आमठाणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथे आज दिनांक 23जुलै2022वार शनिवार रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर हे होते तर प्रमुख पाहुणे पालक जनार्दन व्यवहारे होते. प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश कुरकुटे सर यांनी केले. यानंतर समिक्षा वाघमोडे शिवानी आमटे ऋषिकेश बनकर प्रदिप जैवाळ यांनी स्वागत गीत सादर केले तर प्रणव शिंदे उज्ज्वल भाग्यवंत श्रध्दा बनसोड यांनी लोकमान्य टिळक यांची विषयी माहिती सांगितली. यानंतर शाळेतील शिक्षक श्री कैलास रिंढे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी अध्यक्षीय भाषण देशमुख सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री विठ्ठल पुरी सर यांनी केले.यासाठी शाळेतील शिक्षक श्री विकास पगार सर योगेश देशमुख सर सुलोचना राठोड मॅडम वैशाली ब्राम्हणे मॅडम रामेश्वर सहाणे सर रामेश्वर गरूड सर गजानन पिसे सर समाधान वाघमोडे सर ज्ञानेश्वर गवते सर समाधान राहटे मामा व विद्यार्थी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here