गव्हाणे बाबाच्या ३१व्या पुंण्यतीथी निमित्त करंजीघाट येथे सभामंडपाचा उद्घाटन सोहळा संपन्न

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या करंजी घाट येथे संत गव्हाणे बाबांच्या ३१व्या पुंण्यतीथी निमित्ताने सभामंडपाचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न झाला. आष्टीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विकासनिधी अंतर्गत हा सभामंडप बांधण्यात येणार आहे. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कराळे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर, पाथर्डी, आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून या करंजी घाटावर अनेक भाविक संत गव्हाणे बाबाच्या चरणावर नतमस्तक होतात. संकटमोचन हनुमान मंदिरातचे काम पुरातन झाले असुन त्याचाही जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. या सोहळ्यासाठी आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे,चंद्रकांत म्हस्के,बाळासाहेब अकोलकर,सुनिल साखरे,ह.भ.प उद्धव ढमाळ,बबन भिसे,कांता देवढे,भाउपाटील राजळे,परशुराम मराठे,सुभाष ताठे,चारूदत्त वाघ,अमोल वाघ,बाबा खर्से,ट्राफिक हवालदार, संजय आव्हाड, संभाजी आंधळे, मारुती लवांडे, हे हजर होते.नगरच्या साई माउली दवाखान्या मार्फत भाविकांची मोफत,रक्तदाब, शुगर तपासणी करण्यात आली.या सोहळ्यासाठी बीड आणि नगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here