मनमाड : रोटरी क्लबचे नवे अध्यक्ष इंजि.स्वप्नील सुर्यवंशी व सचिव डॉ.सुमित शर्मा यांच्यासह नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ थाटात संपन्न मनमाड येथे संपन्न झाला, सामाजिक सेवेला धर्म नसतो,तो मानवतेचा भाग असतो.आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा कार्य करणाऱ्या रोटरी क्लब या संस्थेच्या मनमाड येथील कार्यकर्त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक मुळे सामाजिक जीवनावर होणारे परिणाम त्यावर उपाय म्हणून प्लास्टिक बंदी समाजासाठी उपयुक्त असलेल्या उपक्रमांना बळ द्यावे.त्यासाठी विविध सेवाभावी विविध उपक्रम राबवावे,असे आवाहन सेंट झेवियर सोसायटीचे रेव्ह.फादर लॉईड डॅनियल यांनी मनमाड रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभात आपले मनोगत व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबच्या मनमाड शाखेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येथील पल्लवी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जळगांव रोटरी क्लबचे गनी मेमन,सेंट झेवियर्स सोसायटीचे रेव्ह. फादर लॉईड डॅनियल,रोटरी क्लब मालेगांवचे ज्येष्ठ सदस्य शिवनारायण काकाणी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोटरी क्लबचे नवे अध्यक्ष इंजि.स्वप्नील सुर्यवंशी व सचिव डॉ.सुमित शर्मा यांच्यासह नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गनी मेमन यांनी सामाजिक कार्याची व्याख्या स्पष्ट करतांना समाजाचे विविध गरजूंना आवश्यक ते उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले.नवीन पदाधिकाऱ्यांसह नवीन सदस्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी बोलतांना अध्यक्ष सुर्यवंशी यांनी रोटरी क्लब मनमाडच्या माध्यमांतून विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.शिवनारायण काकाणी यांनी मनमाड रोटरी क्लबच्या कार्याचा गौरव केला. मनमाड रोटरी क्लब ही सर्वात जुनी सेवाभावी संस्था असून या संस्थेने आतापर्यंत विविध उपक्रम निष्ठेने राबविले आहेत.रोटरी क्लब ही १०० वर्षापेक्षा जुनी संस्था आहे.महिला रोटरी क्लब देखील प्राधान्याने विविध उपक्रम राबवितात.आगामी काळात मनमाड रोटरी क्लबच्या नवीन टीमने पर्यावरण रक्षण,रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शेती क्षेत्रांत लक्षणीय उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन काकाणी यांनी केले. याप्रसंगी विविध संस्था , संघटना व कार्यकर्त्यांनी नुतन अध्यक्ष स्वप्निल सुर्यवंशी,सचिव डॉ.सुमित शर्मा यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुजितसिंग कांत आणि सुभाष गुजराथी यांनी केले.डॉ . सुमित शर्मा यांनी आभार मानले . राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक आणि सर्व स्थरांतील नागरीक , रोटरी क्लब सदस्य आदी यावेळी उपस्थित होते . महिला रोटरी क्लबतर्फे सौ.सेनेरिटा सुर्यवंशी व सौ.शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले.मावळते अध्यक्ष भूषण शर्मा , खुशाल शर्मा यांनी गतवर्षी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला गेला,
Home Breaking News रोटरी क्लबचे नवे अध्यक्ष इंजि.स्वप्नील सुर्यवंशी व सचिव डॉ.सुमित शर्मा यांच्यासह नुतन...