अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी.

0

मुंबई – वडाळा (प्रतिनिधी -महेश्वर तेटांबे)
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने आतापर्यंत कला -क्रीडा -आणि शैक्षणिक क्षेत्रांत सामाजिक बांधिलकी जपत आपला ठसा उमटविला आहे. आपल्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत समाजातील गुणवंत व गरजू मुलांसाठी एक हात मदतीचा म्हणुन शैक्षणिक वर्ष २१-२२ साठी महाराष्ट्राच्या विविध भागातील. . समाजातील तसेच तळागाळातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १९.०७.२२ रोजी वडाळा येथील गणेश विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अमोल वंजारे, पदाधिकारी संदीप मोहिते, रोहित पवार, संदीप सोनावणे, आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here