पंढरपूरहुन आलेल्या वै. यादवबाबा दींडीचे वाघोली पंचक्रोशीत जोरदार स्वागत

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील वै.यादवबाबा वाघोलीकर,यांच्या दिंडीचे पंचक्रोशीत जोरदार स्वागत करण्यात आले. दि.२७ जून २०२२ रोजी वाघोली येथील वै.यादवबाबा मंदिरापासून या दींडीने प्रस्थान केले होते.पंढरपूरला जाउन पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून परत पायी विणा घेऊन वाघोली येथे आगमन होताच जवखेडे आणि वाघोलीतील सुवासिनी महिलांनी सहकुटुंब औक्षण केले. वाघोली सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक पांडुरंग दातिर यांनी प्रितीभोजन दिले. तेथे ह.भ.प.भालसिंग महाराज यांनी प्रवचन सांगितले. या दिंडीचे मुख्य व्यवस्थापक रमेशराव दातिर यांच्या वस्तीवर चहापाणी करण्यात आले सौ.द्वारका नारायण दातिर, छायाबाई कराळे मँडम,चोपदार रामकिसन चव्हाण यांच्या वतीने ही विणेकरी यांचे औक्षण करण्यात आले. वाघेश्वरी मंदिर, जोडीचे मारूती, आणि शेवटी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापंचारतीने या सोहळ्याची सांगता झाली वै.यादवबाबा वाघोलीकर हे भक्तांच्या नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. पायी आलेले विणेकरी रामभाऊ वाघुलेमामा,भरत लवांडे,माजी सरपंच बाळासाहेब जमधडे,पांडुरंग गारडे,रामभाऊ नेहुल यांचा यादवबाबा संस्थानच्या वतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला. ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांनी सर्वांचे आभार मानले.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here