पाथर्डी तालुका संजयगांधी निराधार योजनेच्या नायब तहसिलदार पदी अनिल तोरडमल यांनी पदभार स्विकारला

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अव्वल कारकून म्हणून सेवेत असलेले अनिल तोरडमल यांनाआता पदोन्नती मिळाली असुन त्यांची नेमनुक पाथर्डी तालुका संजय निराधार योजनेच्या नायब तहसिलदार पदी करण्यात आली आहे.त्यांनी नुकताच पाथर्डी येथील संजयगांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. श्रीक्षेत्र हनुमान टाकळी ग्रामस्थांच्या वतीने हनुमान भक्त दत्तात्रय क्षिरसागर यांनी नायब तहसिलदार अनिल तोरडमल यांचा सत्कार केला.तोरडमल यांचे मूळगाव नगर तालुक्यातील बारदरी हे आहे.काही दिवस कापुरवाडी येथे त्यांनी सर्कल म्हणून ही काम पाहिले आहे.नुकताच पाथर्डीच्या संजयगांधी निराधार योजनेच्या कार्यालयात त्यांनी नायब तहसिलदार म्हणून पदभार स्विकारल्या नंतर सर्व सामांन्य गोरगरिबांना या योजनेच्या माध्यमातून योग्य प्रकारे न्याय मिळवून देउ अशी ग्वाही दिली. यावेळी कार्यालयातील मुख्य लिपिक सदानंद बारसे,सुवर्णा वारकर,शिवकन्या नाटकर,आँपरेटर धाकतोडे हे उपस्थित होते. (प्रतिनीधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here