भारतीय डाकतर्फे देण्यात येणारी अपघात विमा योजना मनमाडमध्ये सुरु करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0

मनमाड : भारतीय डाकतर्फे देण्यात येणारी अपघात विमा योजना मनमाडमध्ये सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनमाड डाक कार्यालयास देण्यात आले. सदर योजने अंतर्गत विमा धारकाला ३९९ रुपयांत १० लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण मिळते. सदर योजना हि जनसामान्यांसाठी अतिशय फायद्याची असल्याने व परीसारतील इतर तालुक्यात सदर योजनेस भरघोस प्रतिसाद मिळत असून सदर योजना मनमाड शहरातील नागरिकांना देखील उपलब्ध करण्यात यावी, असाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. सदर योजना हि भारतीय डाक विभागाने सुरु केली असून मनमाड कार्यालयात त्याचे माहिती पत्रक उपलब्ध होताच सदर योजना मनमाडच्या नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मनमाड डाक कार्यालयातर्फे सिद्धार्थ गायकवाड यांनी दिली आहे. सदर निवेदनावर शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, प्रकाश बोधक, हबीब शेख, अक्षय देशमुख, आनंद बोथरा यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here