औरंगाबाद भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेतर्फे तालुकास्तरीय एक दिवसीय युनिट नोंदणी कार्यशाळा संपन्न

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे
आज दिनांक 11 जुलै 2022 रोजी औरंगाबाद भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेतर्फे एक दिवसीय तालुकास्तरीय युनिट नोंदणी कार्यशाळा गटशिक्षणाधिकारी कार्यालय सिल्लोड येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन तालुक्याचे केंद्रीय मुख्याध्यापक सन्माननीय श्री पीडी साखरे सर यांच्या हस्ते लॉर्ड बेडन पावेल व लेडी बेडन पावेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या कार्यशाळेसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री व्यंकट कोमट वार यांनी देखील फोन द्वारे शुभेच्छा दिल्या व दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील सर्व शाळांनी जास्तीत जास्त कब बुलबुल स्काऊट गाईड युनिट नोंदणी करावी असे उपस्थितांना आश्वासित केले या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक व विविध शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा संघटक श्रीमती प्रिया आधाने व श्रीनिवास मुरकुटे यांनी युनिट नोंदणी बाबत सविस्तर माहिती देत विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली तसेच तालुक्यातील सर्व शाळांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन देखील केले.
*या.स्काउट गाईड राज्य संस्थेच्या तर्फे घेन्यात आलेल्या सन २०१९-२०* राज्यस्तरीय पुरस्कार प्रमाणपत्र चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व त्या चाचणी शिबिरास आपल्या प्रज्ञा जागृती प्रा शा आमठाणा येथिल एकूण ०७ विद्यार्थांनी भाग घेतला होता अजिनाथ कैलास बनकर यशवंत गणपत जाधव विश्वनाथ धनराज साळवे अंकुश दिलीप तायडे गणेश जनार्दन सोमासे शुभम कांताराव अंभोरे संघर्ष उत्तम भिवसाने हे०७ विद्यार्थी राज्यपुरस्कारासाठी पात्र झाले होते परंतु जिल्हातुन फक्त १ मुलगा व १ मुलगी व १ स्काउट शिक्षकांची प्रतिनिधिक स्वरुपात निवड चिठ्ट्या टाकून झाली होती व त्यात इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची निवड झाली होती परंतु जिल्हा स्काउट गाईड वरिष्ठांचे म्हणणे होते कि जिल्ह्यात ग्रामीण भागातुन स्काउट गाईडचे उत्कृष्ट काम करणारी एकमेव शाळा प्रज्ञा जागृती प्रा शा व शाळेतील स्काऊट चे मार्गदर्शक शिक्षक श्री विठ्ठल पुरी सर हे आहे यांना संधी द्यावी. परंतु पुरी सरांनी त्याठिकाणी असलेल्या वरिष्ठांना सांगितले कि कोन्हीही नाराज होता कामानये व आमचे मार्गदर्शक मा. श्री अशोक दादा गरूड यांची आम्हास शिकवन आहे कि शिफारशीने गेल्या पेक्षा मेहनतीने जावे त्या शिकवणी नुसार त्यांनी थेट जाने टाळले होते. ते जरी राज्यपुरस्कार घेन्यासाठी गेले नव्हते तरी जिल्हा स्काउट गाईडच्या अधिकार्यांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थांचे प्रमाणपत्र स्वत: तालुकास्तरीय स्काऊट गाईड बैठकीत मार्गदर्शक शिक्षक श्री विठ्ठल पुरी सरांकडे सुपुर्द केले. राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त सर्व विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री विठ्ठल पुरी सरांचे हार्दिक अभिनंदन…! या कार्यशाळेत तालुका प्रतिनिधी श्री विठ्ठल पुरी, वरिष्ठ लिपिक श्री दिनेश मिसाळ, सेवक श्री हरचंद जारवाल यांनी सहकार्य केले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात तालुकास्तरीय युनिट नोंदणी कार्यशाळा पार पडली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here