पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची कामे मार्गी लावण्याचे समाधान : विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे, ता. १० : श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता भगिनिंचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली आहे असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.पुण्यातील सुप्रसिद्ध निवडुंग्या विठोबा मंदिरात आज त्यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या समवेत दर्शन घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या, ‘ पंढरपूर येथील रुक्मिणी मातेच्या चरणांची झालेली झीज पुरातत्व खात्याच्या सहकार्याने वज्रलेप करून घेता आली. राज्य शासनाच्या माध्यमातून ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात वातावरण खेळते राहण्यासाठी एकझोस्त पंखे बसविण्याची आणि गाभाऱ्यात पावसाचे पाणी येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना करण्याच्या सूचना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. पालखीच्या मार्गावरील ८० टक्के रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे ही समाधानाची बाब आहे. यामुळे मनाला एक वेगळेच समाधान लाभत आहे.याबाबत पंढरपूर देवस्थान आणि जिल्हाधिकारी यांची एकत्र बैठक नुकतीच डॉ. गोऱ्हे यांनी घेतली होती.पुण्यातील शिवसेनेचे स्थान भक्कम असून शिवसैनिकांचे कार्य नेहमीच उत्तम पद्धतीने सुरू असते अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.सांगली जिल्ह्यात वारकऱ्यांना झालेल्या अपघातात जखमी लोकांची चौकशी करून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत स्व-निधितून डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.विठ्ठल मंदिरात यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी धनादेशाद्वारे देणगी दिली. डॉ. गोऱ्हे यांचा यावेळी विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, विभाग संघटक पुणे कॅन्टोन्मेंट श्री. मकरंद केदारी, विभाग संघटक संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर ख़ोळ, संतोष होडे, युवराज पारिख, महिला आघाडीच्या अनुपमा मांगडे, सुलभा तळेकर, विद्या होडे, श्रुती नाझीरकर उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here