मेशी येथे दिव्यांग क्रांती संघटनेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

देवळा : ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ)
मेशी येथे आज दिव्यांग क्रांती संघटनेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र खैरनार ,देवळा तालुका अध्यक्ष अर्जुन देवरे, उपाध्यक्ष बाळू बैरागी, प्रहार शेतकरी संघटना उपाध्यक्ष कृष्णा जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाखेचे पूजन करण्यात आले सदर प्रसंगी मेशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिका बोरसे यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे महत्त्व आपल्या मनोगत आतून व्यक्त केले. तसेच माधव शिरसाट यांची देवळा तालुका संघटक पदी जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र खैरनार यांनी नियुक्ती केली. या कार्यक्रमासाठी मेशी शाखा अध्यक्ष रंजना शिरसाट, उपाध्यक्ष पोपट मोरे, गंगाधर बोरसे, मेशीचे ग्रामसेवक जगन्नाथ शिंदे, सुपडू चव्हाण, केदा चव्हाण, किरण सोनवणे, रामदास अहिरराव, राकेश बोरसे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here