
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होउन शिंदे-फडनविस यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.आगामी काळात महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नव्याने होउ घातलेल्या मंत्रीमंडळात धनगर समाजाला स्थान मिळाले पाहिजे म्हणून धनगर समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते प्रकाश सोनसळे यांनी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर थेट उजैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाऊन तेथील जोतीर्लिंगाची सपत्निक पुजा केली आणि महाकालेश्वरा च्या मंदिरासमोर लोटांगण घालून धनगर समाजाच्या दोन आमदारांना मंत्रीपदे मिळावित म्हणून साकडे घातले.महाराष्ट्र विधान परिषदेत धनगर समाजाचे भाजपाचे दोन आमदार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि दुसरे सांगलीचे विधान परिषदेतील आमदार गोपिचंद पडळकर यांना मंत्री पदे मिळाली पाहिजेत अशी महाष्ट्रातील तमाम धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीला दुजोरा मिळावा म्हणून धनगर समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील समाजाचे सक्रीय कार्यकर्ते प्रकाश सोनसळे आणि त्यांच्या पत्नी माधुरी सोनसळे यांनी महाकालेश्वर मंदिरात जाऊन महाअभिषेक केला. हे मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे.नवसाला पावतो असा पौराणिक कथेत उल्लेख आढळतो. म्हणून या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.आता महांकालेश्वर या भक्तांच्या नवसाला पावतो की नाही हे आगामी काळात पहावयास मिळणार आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
