प्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल कार्यकारिणी सदस्य व द मध्य रेल्वे एम्प्लाईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई चे डेलीगेट प्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा करण्यात आला.ओपन लाईन कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर,द मध्य रेल्वे कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे सचिव व उपाध्यक्ष सागर गरूड आदी उपस्थित होते.यावेळी सतिश झाल्टे, दिपक अस्वले, सतिष भाऊ केदारे, सिद्धार्थ जोगदंड, प्रदीप गायकवाड, विनोद खरे, संदिप धिवर व सत्कारमुर्ती प्रविण अहिरे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले.
सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते प्रविण भाऊ अहिरे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा चे संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, विशाल त्रिभुवन,सागर साळवे, राहुल शिंदे, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे, अर्जुन बागुल, किरण वाघ आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here