कुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या

0

मुंबई :जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई-२८-(प्रतिनिधी) कुर्ला पूर्व शिवसृष्टी रोड येथील वसंतराव नाईक नगर सोसायटी मधील मोडकळीस आलेल्या एकूण पाच ईमारतींपैकी दोन इमारती काल रात्री ११ च्या सुमारास अचानक कोसळल्या .या इमारतीत राहणा-या ७ रहिवाशांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तर दोन मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले आहेत.काल रात्री उशीरा पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहीती घेतली . यावेळी स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर माजी नगरसेवक गौतम साबळे तसेच विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दुर्घटनाग्रस्तांना 5 लाख तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.आज सकाळपासून पुन्हा ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले असून इमारतीत दबलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत .या इमारतीत आणखी २०ते २५ लोक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान नाईक नगर सोसायटी मधील सर्व पाच ईमारती अत्यंत मोडकळीस आल्या असून त्या खाली करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिका एल विभागाने 6 वर्षांपूर्वीच सोसायटीला दिलेली आहे मात्र तरीही या ठिकाणी नागरीक राहत आहेत.उर्वरीत 3 ईमारती त्वरीत खाली करून पाडकाम न केल्यास या ईमारतींसह आसपासच्या रहीवाशांच्याही जीवाला धोका असल्याचे स्थानिकांनी सांगितले.मुंबई महानगरपालिकेने स्वतःहून या इमारती पाडाव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here