नाशिक: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) तर्फे विश्वलता कला, वाणिज्य, विज्ञान कॉलेज भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताहानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.बार्टीतर्फे दरवर्षी वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वृक्ष सर्वांना समान सावली, ऑक्सिजन, फळे, फुले देतात. कोणताही भेदभाव करत नाही. वातावरणात गारवा, पर्यवारणाचा समतोल राखतात हाच संदेश समाजापर्यंत पोहचवा. म्हणून बार्टीच्या समतादूत प्रकल्पमार्फत येवला तालुका समतादूत चंद्रकांत इंगळे यांच्या माध्यमातून गाव, शाळा, स्मशान भूमी, माळरान अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. या अनुषंगाने विश्वलता कॉलेज, भाटगाव ता. येवला येथे सावली व फळे देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगाव ता.येवला जि. नाशिक संचालक श्री भूषण लाघवे , सचिव श्री प्रशांत भंडारे, प्राचार्य प्रा. ज्ञानदेव कदम,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संतोष ढोले,NSS अधिकारी प्रा. अक्षय बळे आणि प्राध्यापक उपस्थित होते. वृक्षारोपण सप्ताह कार्यक्रमासाठी बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.