वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान

0

अहमदनगर (सुनिल नजन) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग आणि व्यवस्थापक रमेशराव दातिर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले.विष्णुपंत भालेराव आणि आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते विधिवत पुजा करुन वाघोली गावातील सर्वग्रामस्थांच्या उपस्थितीत दिंडीला वाजतगाजत अश्रुपुर्ण नयनांनी निरोप देण्यात आला.कोपरे येथे भागिनाथ दिंडे,शहादेव वाघमोडे मंत्री, बळीराम खरात, जगन्नाथ आव्हाड यांनी जोरदार स्वागत केले हनुमान टाकळी येथे शिवनाथ दगडखैर, मेजर अशोक बर्डे,ग्रामसेवक सुरेंद्र बर्डे, अर्जुन जगताप, यांनी चहापाणी करत शतपावली केली. कासारपिंपळगाव येथे नानासाहेब भगत,डॉ रामदास भगत,दत्तात्रय भगत,पत्रकार सुनिल नजन यांनी नाष्टा भोजन देउन दिंडीचा यथोचित सन्मान केला. तिसगाव येथे अरुण पुंड,भाउसाहेब ससाणे यांनी सहभोजन दिले. शिरापूर येथे आदिनाथ लवांडे, आणि व्रुद्धेश्वर येथे नाष्टा भोजन देऊन, गंगादेवी येथे भगवान कुटे यांच्या वस्तीवर मुक्काम करून दिंडीने पंढरपुरकडे रवाना झाली. वै.यादवबाबा यांनी सुरू केलेल्या या दिंडीला ८७ वर्षाची परंपरा असल्याने या दींडीत महाराष्ट्रातील अनेक भाविक सहभागी होत आहेत.पंढरपूर येथे सातारा लिंकरोड चौकातील शिवयोगी मंगल कार्यालयात या दिंडीचा मुक्काम होत आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन-अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here