नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सेस परीक्षेच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.उत्तम यश, आनंद आणि शांती मिळो, या सदिच्छेसह मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या “सर्वांसाठी आरोग्य” या संकल्पनेला साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावाल, अशी अपेक्षा यशवंतांकडून व्यक्त केली.